मागील आठवड्याभरापासून राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. अशातच जून, जुलै महिन्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचं आधीच नुकसान झालं होतं. त्यात आता ऑक्टोबर महिना अर्धा उलटला तरीही राज्यात परतीचा पाऊस बरसतोच आहे. दरवर्षीपेक्षा यंदा राज्यातील पावसाच्या परतीच्या प्रवासाला यंदा १०-११ दिवसांनी विलंब झाला आहे.